रविवार, १३ एप्रिल, २००८

लहर नहीं जहर हूं मै....

या महिन्याच्या मुंबई ग्राहक पंचायतीद्वारे प्रकाशित होण्यार्‍या "ग्राहकहिताय" मध्ये खालील कविता प्रकाशित झालेली आहे. ती त्यांनी "ॠषि प्रसाद" च्या जानेवारी २००८ च्या अंकातुन घेतली आहे व कवि आहेत श्री. गिरीश कुमार जोशी, उदयपुर, राजस्थान. कविता सामान्यांच्या फायद्यासाठी व कोला भक्तांना ईशारा देणारी असल्यामूळे कवि किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय येथे देत आहे.
लहर नहीं जहर हूं मै....
पेप्सी बोली कोका कोला !
भारत का इंन्सान है भोला ।
विदेश से मै आयी हूं,
साथ मौत को लायी हूं ।
लहर नही जहर हूं मै,
गुर्दों पर बढता कहर हूं मैं ।
मेरी पीएच दो पॉइन्ट सात,
मुझमें गिरकर गल जायें दॉंत ।
झिंक आर्सेनिक लेड हूं मैं,
काटे ऑंतों को वो ब्लेड हूं मैं ।
मुझसे बढती एसिडीटी,
फिर क्यों पीते भैया - दीदी ?
ऎसी मेरी कहानी हैं,
मुझसे अच्छा तो पानी हैं ।
दूध दवा है, दूध दूवा है,
मैं जहरीला पानी हूं ।
हॉं, दूध मुझसे सस्ता है,
फिर पीकर मुझको क्यों मरता है ?
५४० करोड कमाती हूं,
विदेश में ले जाती हूं ।
शिव ने भी ना जहर उतारा,
कभी अपने कण्ठ के नीचे ।
तुम मूर्ख नादान हो यारो !
पडे हुए हो मेरे पीछे ।
देखो इन्सां लालच में अंधा,
बना लिया है मुझको धंधा ।
मैं पहुंची हूं आज वहॉं पर,
पीने का नहीं पानी जहॉं पर ।
छोडो नकल अब अकल से जीयो,
जो कुछ पीना सॅंभल के पीयो ।
इतना रखना अब तुम ध्यान,
घर आयें जब मेहमान ।
इतनी तो तुम रस्म निभाना,
उनको भी कुछ कसम दिलाना ।
दूध जूस गाजर रस पीना,
डालकर छाछ मे जीरा पुदीना ।
अननास आम का अमृत,
बेदाना बेलफल का शरबत ।
स्वास्थवर्धक नींबू का पानी,
जिसका नही है कोई सानी ।
तुम भी पीना और पिलाना,
पेप्सी नहीं अब घर में लाना ।
अब तो समझो मेरे बाप,
मेरे बचे स्टॉक से करो टॉयलेट साफ ।
नहीं तो होगा वो अंजाम,
कर दूंगी मैं काम तमाम ।

सोमवार, १७ मार्च, २००८

देवळाचा वाघ आणि कुमाऊंचे आणखी काही नरभक्षक.

जिम कॉर्बेट

हिमालय पर्वताराजीच्या वरच्या अंगाच्या विरळ वस्तीच्या प्रदेशात राहणार्‍या लोकांच्या मनावर अंधश्रद्धांचा केवढा पगडा आहे याची कल्पना, तिथं कधिही न राहिलेल्या लोकांना येणं शक्य नाही. मात्र या अती उंच पर्वतरांगांमध्ये राहणार्‍या साध्यासुध्या निरक्षर गावकर्‍यांच्या अंधश्रद्धा आणि कमी उंचीवर राहणार्‍या सुशिक्षित नि सुसंस्कृत लोकांच्या श्रद्धा यांच्यातील सीमारेषा फारच अस्पष्ट आहे. यांच्या श्रद्धांचा प्रदेश कुठं संपतो नि त्यांच्या अंधश्रद्धांचा कुठं सुरू होतो हे ठरवणं कठीण ...................

देवळाचा वाघ आणि कुमाऊंचे आणखी काही नरभक्षक.
जिम कॉर्बेट
अनुवाद : शरच्चंद्र बडोदेकर
OXFORD University Press.

मंगळवार, ११ मार्च, २००८

भगीरथाचे वारस.

पाऊलखुणा
सांगली जिल्ह्यामधलं रांजणी गाव. या गावातला घरटी एक माणूस लष्करात जातो, याचा रांजणीकरांना अभिमान. ही परंपरा राखणारे बळवंतराव उर्फ नानासाहेब साळुंखे याच गावातले. ते शिपायापासून चढत चढत सुभेदार पदापर्यंत पोहोचले आणि १९४७-४८ साली लष्करी सेवेतून निवृत्त झाले. पुढं वर्षभरातच पोलीसखात्यात हवालदार म्हणून रुजू झाले.
नानासाहेब साळुंख्यांचं पहिलं अपत्य विलास्राव साळुंखे. जन्म २० फेब्रुवारी १९३७ चा. नानासाहेबांच्या बदलीच्या नोकरीमुळं विलासरावांचं प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या गावी झालं. माध्यमिक शिक्षणाची काही वर्षं बेळगाव - सांगलीला, तर उरलेली सोलापुरला झाली.
भगीरथाचे वारस.
"पाणी पंचायती"चे प्रवर्तक विलासराव साळुंखे यांच चरित्र.
वीणा गवाणकर
राजहंस प्रकाशन